अहमदनगर येथील कवी, अभिनेते अमोलशिंदे खलनायकच्या भूमिकेत
प्रतिक इंटरनॅशनल फिल्म्स प्रस्तुत, हृदयमानव अशोक लिखित, दिग्दर्शित, ऋषिकेश सूर्यवंशी आणि नरेंद्र कन्नाके निर्मित गार्गी लघपुटात अहमदनगर येथील कवी, अभिनेते अमोल शिंदे यांनी प्रथमच खलनायकाची भूमिका साकारली आहे. एका सामाजीक आणि स्त्रीप्रधान असलेल्या लघुपटात राज्यातील बहुतांश नवोदित कवीनी भूमिका साकरल्या आहेत. लघुपट एक सामाजिक आणि सकारात्मक सन्देश देत आहे. इच्छा शक्ति असेल तर स्त्री कुठे ही कमी पड़त नाही तर संपुर्ण घर गाड़ा तिच्या इच्छा शक्तीच्या जोरावर यशस्वी रित्या पूर्ण होतो ही गोष्ट या लघुपटात अधोरेखित केली आहे. लघुपटात मुख्य भूमिकेत रायगड जिल्ह्यातील देवश्री आग्रे आहे, तर पाहुण्या भूमिकेत निर्माते आणि दिग्दर्शक अशोक सूर्यवंशी आहेत. इतर महत्वपूर्ण भूमिकेत निखिल जगताप, रेणुका सातपुते, राम गायकवाड़, अमृता जोशी, पायल लांडे, वर्षा राशिनकर, निकिता लांडगे,सुप्रिया दापके, सुमित गुणवंत, शेख अख्तर यांनी भूमिका साकरल्या आहेत. सचिन ढोबळे आणि अक्षय भिलारे यांनी प्रोडक्शन ची जबाबदारी पार पाडली आहे. लघुपटात प्रथमच गाण्याचा वापर करण्यात आला आहे. देवश्री आग्रे हिने हे गीत लिहले असून गायन रमणी सोनवणे आणि नेत्रा निनावे यांनी केले आहे तर संगीत सागर मोरे आणि हृदयमानव अशोक यांनी दिले आहे लघुपटाचं छायांकन रणजीत भानवसे यांचं आहे तर, स्पेशल एडिटिंग सागर काकड़े यानी केली आहे. लघुपटात प्रथमच गाण्याचा वापर करण्यात आला आहे. देवश्री आग्रे हिने हे गीत लिहले असून गायन रमणी सोनवणे आणि नेत्रा निनावे यांनी केले आहे तर संगीत सागर मोरे आणि हृदयमानव अशोक यांनी दिले आहे बहुचर्चित चित्रपट अणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवारांची उपस्थिती असलेल्या 3र्या शब्दविद्या साहित्य स्नेहसंमेलनात हा लघुपट प्रदर्शित होईल. लघुपट अनेक फ़िल्म फेस्टिवल नंतर यु ट्यूब वर सर्वांना पहायला मिळेल.