शेतीमालाचे भाव पाडण्याचे पाप भाजप सरकारचेच : राजू शेट्टी
जालना : शेतकर्यांच्या शेतमालाचे भाव पाडण्याचे मुख्य पाप भाजप सरकारने केले आहे. त्यांनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवून मते घेतल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील शेतकरी सन्मान अभियान दौर्यादरम्यान आयोजित सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, महिला आघाडी अध्यक्षा रसिका ढगे, पूजा मोरे, सयाजी मोरे, अॅड. आशा गाडेकर यांच्यासह जिल्हा आणि इतर ठिकाणाहून मोठ्या संख्येने शेतकरी आणि स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार राजू शेट्टी म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी एकटा पडला आहे. शेतकर्यांचा सरकारी व्यवस्थेवरचा तसेच शेतकरी चळवळीवर विश्वास उडाला आहे. शेतकर्यांना धीर, बळ, धैर्य देऊन लढण्याची ताकद देण्यासाठी शेतकरी सन्मान अभियान दौर्याचे आयोजन केले आहे. रशियातून डाळ, तर मलेशियातून पामतेल आणि पाकिस्तानातून उत्तर प्रदेश, पंजाबमार्गे चोरट्या मार्गाने साखर आयात केल्यामुळेच देशातील शेतीमालाचे भाव पडले. याला सर्वस्वी पंतप्रधान जबाबदार आहेत. प रिणामी, शेतकरी कर्जबाजारी होऊन त्यांच्यावर हे कर्ज लादले आहे.
केंद्र सरकारमध्ये सध्या मोदीराज आहे. हे मोदीराज शेतकर्यांपेक्षा मल्टिनॅशनल कंपन्यांवर मेहरबान झाले आहे. पीक विम्यापोटी केंद्र सरकारकडे 9 हजार 41 कोटी रुपये जमा असताना शेतकर्यांना फक्त 700 कोटी रुपये मिळाले. त्यामुळे ही पीक विमा योजना पंतप्रधान पीक विमा योजना नसून कॉर्पोरेट लूट योजना आहे. ज्या योजना, ज्या अपेक्षेसाठी सरकारमध्ये सहभागी झालो होतो, त्या सर्व अपेक्षांचा भंग या सरकारने केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे खासदार शेट्टी यांनी यावेळी सांगितले.