Breaking News

कर्नाटक निवडणुकीवर 1500 कोटींचा सट्टा

मुंबई - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता काही मोजके दिवस उरले आहेत. निवडणूक प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. काँग्रेस भाजपच्या या अटीतटीच्या रणसंग्रामात कोण बाजी मारणार? यावरून आता सट्टाबाजार सक्रिय झाला आहे. सट्टा बाजारात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या भावात प्रत्येक दिवशी चढ- उतार होताना दिसत आहे. आतापर्यंत कर्नाटक निवडणुकीत 1500 कोटी रुपयांचा सट्टा लागल्याची माहिती मिळत आहे.

कर्नाटक निवडणुकीसाठी वेगवेगळ्या एजन्सीने केलेल्या प्री-पोल सर्वेमध्ये काँग्रेसला अधिक जागा मिळणार, अशी परिस्थिती दाखविली जात आहे. तर त्या उलट सट्टा बाजारात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या भावामध्ये चढ उतार होताना दिसत आहे. सुरुवातीला काँग्रेस पक्षाच्या बाजूने अधिक बेटिंग होत असताना दिसत होते. पण त्यानंतर प्रचार शिगेला जसा जसा पोहोचत आहे, त्या प्रकारे सट्टा बाजारात भाजप पक्षाला अधिक पसंती दिली जात आहे. आतापर्यंत कर्नाटक निवडणुकीत 1500 कोटी रुपयांचा सट्टा लागल्याची माहिती मिळत आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत सट्टा बाजारात भाजपचा भाव चांगलाच वधारला आहे. भाजपला 10वर 11चा भाव दिला जात आहे. म्हणजेच भाजपवर 10 रुपये लावणार्‍याला 21 रुपये मिळतील. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप 100 जागा जिंकेल, असा सट्टा बाजारातील बुकींचा अंदाज आहे.