मुली दत्तक घेण्यात महाराष्ट्र अव्वल!
नवी दिल्ली : भारतात गेल्या 6 वर्षात दत्तक घेतलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या मुलींची आहे. विशेष म्हणजे मुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर असल्याची बाब सरकारी मा हितीतून समोर आली आहे. देशात 2012 पासून प्रत्येक राज्यात मुल दत्तक घेण्याचे प्रमाण किती आहे, याबाबतच्या माहितीच्या अधिकाराला चाइल्ड अॅडॉप्शन रिसर्च ऑथोरिटीने (उ-ठ-) उत्तर दिले आहे. त्यानुसार, भारतात गेल्या 6 वर्षांमध्ये दत्तक घेतलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या मुलींची आहे. दत्तक घेतलेल्यांमध्ये 60 टक्के प्रमाण मुलींचे आहे. विशेष म्हणजे, मुलींना दत्तक घेण्याच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. त्यानंतर कर्नाटक आणि पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. सीएआरएचे सीईओ लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात वर्ष 2017-18 मध्ये एकूण 3 हजार 276 जणांना दत्तक घेण्यात आले. त्यापैकी 1 हजार 858 मुली होत्या. महाराष्ट्रात 2017 मध्ये 642 जणांना दत्तक घेण्यात आले. त्यापैकी मुलींची संख्या 353 इतकी आहे.
महाराष्ट्रात मुल दत्तक देणार्या संस्था 60 आहेत तर, सरासरीचा विचार करता इतर राज्यात या संस्था 20च्या जवळपास आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात दत्तक घेण्याचे प्रमाण जास्त आहे. 2016-17 च्या आकडेवारीनुसार, भारतात एकूण 3 हजार 210 जणांना दत्तक घेण्यात आले. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक 711, त्यानंतर कर्नाटक (252) आणि प श्चिम बंगालचा (203) क्रमांक आहे. या आकडेवारीनुसार, गेल्या 5 वर्षांत देशात 59.77 टक्के जोडप्यांनी मुलींना दत्तक घेतले. तर, 40.23 टक्के जोडप्यांनी मुलांना दत्तक घेण्यास प्राधान्य दिले आहे.