Breaking News

पालकमंत्र्यांकडून गारपीटग्रस्त पिकांची पाहणी


सोलापूर, दि. 02, मे - गारपीट व वादळी वा-याच्या तडाख्यात शेतक-यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेल्या बेंबळे येथील पिकांची पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. बबनराव शिंदे यांनी नुकतीच पाहणी केली. मुख्यमंत्री, मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांना नुकसानीची माहिती देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन देशमुख यांनी शेतक-यांना दिले. 

17 ए प्रिल रोजी बेंबळे व परिसरात वादळी वा-याने व प्रचंड प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे केळी, डाळिंब, ऊस, टोमॅटो, द्राक्षे आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या गारपीटग्रस्त बेंबळे येथील पिकांची पाहणी करण्यासाठी देशमुख, आ. शिंदे आले होते. यावेळी त्यांनी उपस्थित शेतक-यांना दिलासा देत ठोस मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले.