Breaking News

जामखेड दुहेरी हत्याकांडप्रकरणी 5 जणांना अटक


अहमदनगर, दि. 02, मे - जामखेडमध्ये गोळीबार करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. सोमवारी मध्यरात्री पोलीसांनी ही क ारवाई केली आहे. कैलास विलास माने(वय 46) व प्रकाश विलास माने(वय 44 दोघे राहाणार तपनेश्‍वर रोड,जामखेड)या दोघांना खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे. तर, दत्ता रंगनाथ गायकवाड(वय 50,राहाणार तेलंगशी,तालुका जामखेड),सचिन गोरख जाधव(वय 34,राहाणार भांडेवाडी,तालुका कर्जत) व बापू रामचंद्र काळे (वय 50,राहाणार नेर्ले,तालुका करमाळा,जिल्हा सोलापूर) या तिघांना खुनाच्या गुन्ह्यात आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. 

28 एप्रिल रोजी (शनिवारी) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास जामखेड बाजार समितीच्या प्रवेशव्दारा समोरील एका दुकाना जवळ योगेश राळेभत व राकेश राळेभात या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला. या घटनेमुळे जामखेड सहीत सूपर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतांवर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला होता. मात्र पोलीस अधिकार्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर रविवारी रात्री उशीरा तणावपूर्ण वातावरणात योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व आरोपींना तातीने अटक करावी या मागणी साठी जामखेडमध्ये सलग दोन दिवस कडकडीत बंद देखील पाळण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर आरोपींच्या शोधासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक रंजन कुमार शर्मा यांनी 15 वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती केली होती. पोलिसांनी हत्याकांडाच्या दुस-या दिवशी 4 संशयितांना चौकशी साठी ताब्यात घेतले होते .त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे सोमवारी रात्री पोलीसांनी कसून तपास मोहीम राबवून 5 जणांना अटक करण्यात यश मिळविले आहे.