Breaking News

पुण्यात दहा लाखांचा गांजा पकडला


पुणे, दि. 02, मे - पुणे ग्रामीण पोलिसांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या संशयास्पद वाहनांची तपासणी केली असता तब्बल 200 किलो वजनाचा आणि 10 लाख रुपये किंमतीचा गांजा आढळून आला. हा गांजा पंचासमोर जप्त करण्यात आला असून दहा लाख रुपये किंमतीची गाडीही जप्त करण्यात आली आहे. 

शिरगाव येथील गहुंजे गावाकडे जाणा-या रस्त्याने पोलीस उपनिरीक्षक नितीन मोहिते आणि इतर कर्मचारी गस्त घालत असताना रस्त्याच्या कडेला संशयास्पद वाहन आढळून आले. शासकीय वाहन येत असल्याचे पाहून दोन इसम गाडी तेथेच सोडून पसार झाले. गाडीची पाहणी केली असता गाडीच्या मागील सीटवर तब्बल 200 किलोचा गांजाचे पॅकेट असलेली कॅरीबॅग आढळून आली. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक मुगुट पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीष दिघावकर यांना देण्यात आली. या गुन्ह्यातील गाडी आणि 200 किलो गांजा हा पंचासमोर जप्त करण्यात आला.