Breaking News

दिल्ली-डेहराडून राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारमध्ये एका महिलेवर बलात्कार

मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील दिल्ली-डेहराडून राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारमध्ये एका महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. हे दुष्कृत्य महिलेच्या तीन वर्षांच्या मुलाला वाहनाबाहेर फेकल्यानंतर करण्यात आले. गावकऱ्यांनी मुलाला रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. घटनेतील आरोपी फरार असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. शुद्धीवर आल्यानंतर पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. आरोपी आर.के. मेहता नावाच्या व्यक्तीने नोकरीचे आमिष दाखवून मला बोलावले होते. पेयात मादक द्रव्य पाजून मेहता आणि त्याच्या एका मित्राने माझ्यावर बलात्कार केला आहे.