Breaking News

ईश्वराचं सुंदर आणि प्रेमळ रूप म्हणजे आई!

आजमितीला प्रत्येक देशात वेगवेगळ्या दिवशी जागतिक मातृदिन साजरा केला जातो. भारतामधे दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्यात येतो. आईला आदर आणि सन्मान देण्यासाठी वर्षातून हा एक दिवस निवडला जातो. मात्र यासाठी एकच दिवस का? आईला आदर आणि सन्मान देण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची झालं तरी ते पुरेसं नाही. कारण ईश्वराचं सुंदर, प्रेमळ रूप म्हणजे आई. मानवी जीवनात आईचं महत्व अधोरेखित करण्यासाठी मातृदिनाच्या निमित्ताने केलेला हा शब्दपपंच......

माँ भगवान की सुन्दर निर्मिति

माँ शक्ति की प्रतिक होती है

भगवान् की स्वरुप होती है माँ...

जिसके बिना विश्व का निर्माण अशक्य है.....

हा एक आधुनिक पद्धतिचा सन आहे. ज्याची निर्मिति उत्तर अमेरिकमध्ये आई ला सन्मान देण्यासाठी झाली होती. त्याचप्रमाणे प्रत्येक समाजामधे आईविषयी प्रेम निर्माण व्हावे, त्यासाठी हां दिवस साजरा केला जातो. अशा आईला ‘लाख लाख सलाम… 

१९१२ मध्ये एना जार्विस ने mothers Day International association ची स्थापना केली. त्यानंतर आपापल्या देशांमध्ये आपल्या आईला विशेष भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाऊ लागले. पूर्वीच्या इतिहासामधे जर आपण पाहिले तर भारतात पहिली मातृसत्ताक पद्धती होती. ‘आ’ म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर यांचे मिलन म्हणजेच आई! याचाच अर्थ आईची सेवा करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे होय. आई प्रेमाचे दुसरे नाव. तिच्यामधे नेहमी क्षमाभाव असतो. साने गुरूजी ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहून संपूर्ण जगात अजरामर झाले. जर जेवणामधे मीठ नसेल तर जेवनाला चव राहत नाही. तसेच जीवनात आई नसेल तर जगण्याला किंमत राहत नाही. कवी यशवंत असे म्हणतात, 

‘स्वामी तिन्ही जगाचा,

आई विना भिकारी’.

हे खरे आहे. जर आपल्या जीवनात आईचे प्रेम नसेल तर आपल्याकड़े असणाऱ्या संपत्ती ऐशोराम याचा काय उपयोग?

जर आई नसेल तर जीवन शून्य असल्यागट आहे. मुलाच्या प्रत्येक श्वासात आईचे प्रेम सामावलेले असते. म्हणून तर आपली आई आपल्या प्रत्येक अपराधाला क्षमा देत असते. ज्या वेळेस हिरकनि गडावरून रात्री आपल्या मुलाला दूध पाजायला काटे तुडवित गडाच्या पायथ्याशी आली. त्यावेळी शिवाजी महाराजांना ही बातमी कळताच महाराजांनी तिचा सन्मान केला. शिवाजी महाराज एवढे शूरवीर आणि ताकदवान झाले. त्याचे कारण म्हणजे राजमाता जिजाऊ माँ साहेब. पाया नुसती ठेच् जरी लागली तरी आपल्या तोंडातून अचूक ‘अग आई गं’ हा शब्द बाहेर पडतो. चकाकणारी तलवार घेऊन पाठीला आपल्या मुलाला बांधून इंग्रजांसोबत लढाई करुन इतिहासात अजरामर झालेल्या माता शकुंतलाने आपल्या मुलाला उत्तम संस्कार देऊन राजा अशोक चक्रवर्ती सम्राट बनवले.

विश्वमाता मदर टेरेसा पूर्ण जगामधे प्रेरणादायी ठरल्या. आईच्या पायाजवळ स्वर्ग असतो म्हणून प्रत्येकाने आईच्या चरणाशी दंडवत हा घातलाच पाहिजे. 

प्रदिप वाळके, वितरण विभाग, दैनिक लोकमंथन.