Breaking News

लग्नातील सत्काराला फाटा देऊन शाळेला दिली देणगी विरोली येथील गाडगे परिवाराचा नवा आदर्श

टाकळी ढोकेश्वर / वार्ताहर - लग्न म्हटले की अनावश्यक खर्च समाजाच्या समाधानासाठी करावाच लागतो असा समज ग्रा मीण भागा सोबत शहरी भागातही आहे मात्र हा खर्च विनाकारण वाया जातो तोच धागा पकडुन विरोली ( ता .पारनेर ) येथील पांडुरंग सबाजी गाडगे या प्रगतशील शेतकऱ्याच्या सैन्यामध्ये भारतीय सिमेवर सेवाकरणाऱ्या रुपेशचे पाडळी दर्या येथील भास्कर जाधव यांची मुलगी माधुरीसोबत पारनेर येथे मंगल कार्यालयात लग्नसोहळा पार पाडला मात्र सत्कार समारंभाला फाटा देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एकवीसशे रुपये देणगी देऊन एक नवा आदर्श निर्माण केला व ग्रामस्थानी ज्ञान मंदिर असणाऱ्या जि .प. शाळेला मदत करण्याचे आवाहन केले . जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अॅड आझाद ठुबे यांच्या हस्ते बाबाजी डोळस यांनी देणगी स्विकारली यावेळी कान्हूरपठार पतसंस्थेचे कार्यकारी संचालक दिलीपराव ठुबे कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन प्रशांत गायकवाड जि .प . सदस्या उज्वला ठुबे , ग्रामसेवक संघटनेचे उपाध्यक्ष संजय मते , अशोक ठुबे , सखाराम ठुबे दत्ता रसाळ , भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विश्वास रोहकले किसन गंधाडे राजेंद्र तारडे , पत्रकार संजय मोरे आदी मान्यवरासह ग्रामस्थ उपस्थित होते उत्तम गाडगे ,गवराम गाडगे यानी उपस्थितांचे आभार मानले