जवानाने पत्नी, २ मुलांसह केली आत्महत्या
त्रिपुरा स्टेट रायफल्स(टीएसआर)च्या एका जवानाने मंगळवारी सकाळी पत्नी व दोन मुलांवर गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएसआरच्या पहिल्या बटालियनचे जवान माणिक घोष (४०)याने आधी पत्नी रत्ना घोष (३४) यांना स्वयंपाकघरात गोळी झाडली. त्यानंतर मुलगा दीपराज (१०) व मुलगी इप्शिता घोष (४) यांच्यावरही गोळ्या झाडल्या. माणिकने त्याच्या वडिलांवर आणि लहान भावावरही गोळी चालवली. पण ते बचावले. अहवालानुसार, माणिक सायंकाळी ५.३० वाजता गकुलनगर बटालियनच्या मुख्यालयात गेला. तेथून एसएलआर घेऊन घरी परत आला. आणि हत्याकांड घडवले. हत्येमागे पत्नीचे दुसऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता, असे कारण सांगितले जाते. यावरून पत्नीशी त्याचे नेहमी वाद होत होते. याच गोष्टीवरून एक दिवसापूर्वी दोघांत भांडणेही झाली होती.