कामावर असताना पोलिसच दारू प्यालेल्या अवस्थेत आढळल्याने त्याची थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. अजय शर्मा नावाचा सहायक फौजदार वैशाली जिल्ह्यातील सदर पोलिस ठाण्यात नोकरीस होता. त्याला निलंबित करण्यात आले असून वैद्यकीय तपासणीनंतर तुरुंगात धाडण्यात आले, असे पोलिस अधीक्षक मानवजीतसिंग धिल्लन यांनी सांगितले.