टीव्ही बघण्यावरून झालेल्या भांडणानंतर मुलीची फाशी घेऊन आत्महत्या
नोएडा : टीव्ही बघण्यावरून धाकट्या बहिणीसोबत झालेल्या भांडणानंतर १० वर्षीय मुलीने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये घडली. मानसी असे मृत मुलीचे नाव आहे. सेक्टर १२ मध्ये राहणाऱ्या प्रवीण कुमार यांच्या मुलीचे मंगळवारी सकाळी आपल्या धाकट्या बहिणीसोबत टीव्ही बघण्यावरून भांडण झाले. भांडणानंतर रागाच्या भरात मानसीने आपल्या खोलीत आत्महत्या केली. मानसी पाचवीच्या वर्गात शिकत होती, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक राजीवकुमार सिंग यांनी दिली. घरातील ७२ वर्षीय वृद्ध महिलेने मानसीला लटकलेले पाहिल्यानंतर आरडाओरड केली. यानंतर नातेवाइकांनी तातडीने मानसीला नोएडातील मेट्रो रुग्णालयात दाखल केले; परंतु या ठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले