Breaking News

दोन महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार करणाऱ्या नराधमास फाशी

इंदोर : अवघ्या दोन महिन्यांच्या बालिकेवर पाशवी अत्याचार करून तिची निर्दयपणे हत्या केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने आरोपीवर शीघ्रगतीने खटला चालवून फाशीची शिक्षा ठोठावली. . समाजाला शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या या प्रकरणात पोलिसांनीही अत्यंत संवेदनशीलता दाखवत तपास अवघ्या काही दिवसांत पूर्ण केला. अप्पर सत्र न्यायालयानेही दररोज सुनावणी घेत हा खटला अवघ्या २२ दिवसांत निकाली काढला. हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे नमूद करून न्या. वर्षा शर्मा यांनी आरोपी नवीन गाडके(२६) याला भादंवि कलम ३७६ (अ) अन्वये दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली. त्याचबरोबर आरोपीला भारतीय दंडविधान संहितेची अन्य संबंधित कलमे आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही गुन्हेगार ठरवण्यात आले.