Breaking News

तरुणीला ब्लॅकमेल करून अत्याचार करणाऱ्यास अटक

संगमनेर/प्रतिनिधी। गावातील तरुणीला जुने फोटो सोशल मिडियावर टाकण्याची भिती दाखवून ब्लॅकमेल करत शिर्डी येथील लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणाला संगमनेर शहर पोलिसांनी अटक केली. संतोष शरद बांबळे (रा. नवलेवाडी, अकोले) असे त्याचे नाव आहे. त्याने त्याच्या गावात राहणाऱ्या तरुणीवर अत्याचार केला. बुधवारी {दि. ९ मे } सायंकाळी पाच वाजता उदगीर (जि. लातूर) येथून ही तरुणी संगमनेर बसस्थानकावर आली होती. यावेळी आरोपी बांबळे याने तिची भेट घेत पूर्वीचे तिचे काही जुने फोटो तिला दाखवले. ते फेसबुकवर टाकण्याची आणि तिला जीवे मारण्याची धमकी देत मोटारसायकलवर बसवून शिर्डी येथील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले. याबाबत पिडित तरुणीने अकोले पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा शून्य क्रमांकाने शहर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग झाला. शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अटक केली. सहाय्यक निरीक्षक शंकरसिंग रजपूत अधिक तपास करत आहेत.