अ.भा. छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- महापुरुषांचा आदर्श समोर ठेवून युवकांनी वाटचाल करावी. संभाजी महाराज हे सर्वगुण संपन्न होते. त्यांच्या पराक्रमाचा इतिहास जाणून, प्रेरणा घेण्याची खरी गरज आहे. स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांचे बलिदान न विसरता येणारे असल्याची भावना अहमदनगर जिल्हा कारागृहाचे अधिक्षक श्यामकांत शेडगे यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने दिल्लीगेट येथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी शेडगे बोलत होते. प्रारंभी त्यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुरेखा सांगळे, जागृक नागरिक मंचचे सुहास मुळे, अंजली देवकर, मेजर रफिक शेख, अॅड.अनिता दिघे, मंजू बागडे, मंगल औटी, जयदिप मगर, किशोर आठरे, दिपक शिंदे, पांडूरंग मोडवे, आकाश काळे, अशोक आठरे, कानिफनाथ गवारे आदि उपस्थित होते.
सुरेखा सांगळे म्हणाल्या की, महाराजांचा खरा इतिहास पुढे घेवून जाण्यासाठी स्व.शिवाजी सांगळे यांच्या प्रेरणेने दरवर्षी संभाजी महाराजांची जयंती दिल्लीगेटला साजरी केली जाते. समाजातील दुबळ्या घटकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी अ.भा. छावा संघटना कार्यरत असल्याचे सांगून, राबविण्यात येणार्या विविध सामाजिक उपक्रमाची त्यांनी माहिती दिली.