मुरमेच्या सरपंचपदी अजय साबळे यांची बिनविरोध निवड देवगड येथे भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील मुरमे (देवगड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अजय साबळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून गाडे यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामविकास अधिकारी शेळके, तलाठी दिघे, माजी सरपंच विजय चापे, राजेंद्र चापे, सुदाम चरवडे, संदिप साबळे, मारुती साबळे, बाळासाहेब वरखडे, अर्जुन वरखडे, किसन चरवडे, एकनाथ मोरे, सुरेश माळी, दत्तात्रय मोरे, रघु मोरे, पी.बी. साबळे, वेनुनाथ साबळे, शंकर वरखडे आदि उपस्थित होते.
अजय साबळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्री क्षेत्र देवगड संस्थानकडून ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थानचे कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुरमे ग्रामपंचायतीत पिंप्री व मडकी या गावाचा समावेश आहे. या तिन्ही गावाचा विकास केला जाईल असे सरपंचपदी निवड झाल्यावर साबळे यांनी सांगितले.