चाळीसगावात गावठी कट्ट्यासह एक जाळ्यात
जळगाव : चाळीसगाव येथे रेल्वे स्टेशन परीसरातील हॉटेल दिलबहार परीसरात एक संशयीत गावठी कट्ट्यासह येणार असल्याची चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना सूचना केल्यानंतर लावलेल्या सापळ्यात एकाला गावठी कट्टा व एक जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली. रविवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली तर आरोपीविरुद्ध चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मुकेश उर्फ पप्पू पाटील असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.