टीईटी आणि यूजीसी-नेट परीक्षा एकाच दिवशी , उमेदवारांना गमवावी लगणार एका परीक्षेची संधी
शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्राध्यापक होण्यासाठी किंवा कनिष्ठ संशोधक म्हणून काम करण्यासाठी नेटमध्ये पात्र होणे आवश्यक असते. यंदा या दोन्ही परीक्षा ८ जुलै रोजी होणार आहेत. दरवर्षी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आणि शिक्षणशास्त्रातील पदवी किंवा पदविका घेतलेले हजारो उमेदवार या दोन्ही परीक्षा देतात. मात्र यंदा या परीक्षा एकाच दिवशी होत असल्यामुळे उमेदवारांना दोन्हींपैकी एका संधीवर पाणी सोडावे लागणार आहे.