Breaking News

कामास विलंब होत असल्याबद्दल व्यक्त केली तीव्र नाराजी....

कळवण प्रतिनिधी--कळवण तालुक्यातील रवळजी फाटा ते जयदर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्याने पुनद खोर्‍यातील शेतकर्‍यांनी आक्रमक होत कळवण येथे रास्ता रोको आंदोलन करुन तत्काळ रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.अधिकार्‍यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कळवण तालुक्यातील रवळजी फाटा ते देसराणे,नाळीद,जयदर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असुन नागरीकांना प्रवास करतांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.सदर रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असुन देखील कामास विलंब होत असल्याने पुनद खोर्‍यातील नागरीक संतप्त झाले आहेत.बुधवारी कळवण बसस्थानक ासमोर शेतकरी व नागरीकांनी रास्ता रोको आंदोलन करत या रस्त्याचे काम तत्काळ सुरु करण्याची मागणी केली.यावेळी तहसीलदार कैलास चावडे,पोलिस निरिक्षक सुजय घाटगे यांनी आंदोलकांशी चर्चा करत संबधित अधिकार्‍यांसमवेत समन्वय बैठक घेण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.त्यानंतर दुपारी बारा वाजता क ोल्हापुर फाटा येथील प्रशासकीय कार्यालयात आंदोलकांशी चर्चा करण्यात आली.सध्या आचारसंहितेचा अडसर असल्याचे सांगत लवकरच कामास प्रारंभ करु असे आश्‍वासन अ धिकार्‍यांनी दिले आहे.त्यामुळे आता पुनद खोर्‍यातील महत्वाचा असलेला या रस्त्याचा प्रश्‍न लवकर मार्गी लागणार का हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.यावेऴी सुळे उजवा क ालव्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणीही आंदोलकांनी केली.
रास्ता रोको आंदोलनात रवळजी,देसराणे, नाळीद, इन्शी परिसरातील सर्वपक्षिय पदाधिकारी,नेते, कार्यकर्ते, शेतकरी,युवक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलिस निरिक्षक सुजय घाटगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त तैनात होता.

दै.लोकमंथन ने उठवला होता आवाज--
रवळजी-फाटा ते देसराणे रस्त्याबाबत रविवार दि.13 मे रोजी दैनिक लोकमंंथन मध्ये आम्हना रस्ता ले वाली कोण ? ह्या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते.रस्त्याची दुरावस्था व पावसाळ्यात होणारे हाल या पार्श्‍वभुमीवर रवळजी-देसराणे परिसरातील नागरीकांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केले.आता अधिकारी दिलेल्या आश्‍वासनाला जागतात का की,नागरीकांना पुन्हा रस्त्यासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागतो हे बघणे महत्वाचे ठारणार आहे.