Breaking News

पीसीए संदर्भात आरबीआयची होणार बैठक

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून बँकिग क्षेत्रात उघड झालेल्या घोटाळयाचा विचार करता त्या बँकाच्यावर प्रॉम्पट करेक्टीव्ह ऍक्शन (पीसीए) लावण्यात आली होती. पण आता सरकार कडून त्याची उलट तपासणी करण्यात येणार असून त्या संदर्भातील बैठकीचे आयोजन 17 मे रोजी करण्यात येणार असल्याचे रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाने सादर केले आहे. या बैठकीत पब्लिक क्षेत्रामध्ये असणा़र्‍या अकरा बँकाच्या वरती असणा़र्‍या पीसीए च्या संदर्भात उलट तपासणी करण्यात येणार असुन त्यातील इतर घटकाच्यावर विस्ताराने चर्चा करण्यात येणार असल्याचे सचिव राजीव कुमार यांनी सांगितले.