Breaking News

शिंदखेडा तालुक्यात घराला आग; 50 हजाराची रोकड खाक

धुळे, दि. 17, मे - धुळे जिल्ह्यातील परसामळ ता. शिंदखेडा येथील ग्रामपंचायत सदस्या सारुबाई भील यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत गोंधळाच्या कार्यक्रमासाठी जमवून ठेवलेल्या 50 हजाराच्या रोकडसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. 

परसामळ येथील ग्रामपंचायत सदस्या सरुबाई भिल घराच्या ओट्यावर तर पती श्रावण भिल हे होळ पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीवर झोपले असतांना त्यांच्या घराला अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी धाव घेतली. गावातील पाण्याचे नळ सुरु करुन आग नियंत्रणात आणली. तोपर्यंत शिंदखेडा येथुन अग्नीशामन बंबही दाखल झाला होता.