Breaking News

निलकमल कोरडे सेट परीक्षा उत्तीर्ण


नेवासा फाटा प्रतिनिधी - नेवासा तालुक्यातील खेडलेकाजळी येथील प्रगतशील शेतकरी रामदास कोरडे यांची कन्या निलकमल कोरडे हिने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात झालेल्या राज्य पात्रता परीक्षेत २०२ गुण मिळवून पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. निलकमल हिस न्यू आर्ट कॉलेजचे प्रा. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल आ. बाळासाहेब मुरकुटे, माजी आ. संभाजी फाटके, प्राचार्य आगळे, प्राचार्य कर्डिले, ज्ञानेश्वर कोरडे, कोरडे पाटील विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मरकड यांनी अभिनंदन केले.