Breaking News

सी. बी. एसी परीक्षेत ‘प्रवरा’चे घवघवीत यश


प्रवरानगर: मार्चमध्ये घेण्यात आलेल्या सी. बी. एसी बारावी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचा निकाल ९४. ११ टक्के इतका लागला. स्मित विजय कानवडे हा ९२.२० टक्के गुण मिळवून पहिला, ओमकारनाथ प्रसाद पानगे ८५. ८० टक्के गुण मिळवून दुसरा तर अथर्व श्रीपाद मैड हा विद्यार्थी ८४. ४० टक्के गन मिळवुन तिसरा आला आहे. तसेच इंग्रजी विषयात प्रियांका थॉमस ९१ गुण, जीवशास्त्र ओमकारनाथ प्रसाद पानगे याने ८४ गुण आणि भौतिकशास्त्र ९५, केमेस्ट्री ९५, गणित ९४ आणि माहिती तंत्रज्ञान विषयात ९५ गुण मिळवून स्मित विजय कानवडे याने शाळेमध्ये पहिला येण्याचा मन मिळविला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विरोधी पक्षनेते व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, शिक्षणाधिकारी प्रा. शिवाजी रेठरेकर, प्रा. विजय आहेर, सेंट्रल पब्लिक स्कूलच्या प्राचार्या स्वाती लोखंडे आदी शिक्षकांनी अभिनंदन केले.सी. बी. एसी परीक्षेत ‘प्रवरा’चे घवघवीत यश