Breaking News

शिर्डी-निमगाव शिवरस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात, पोलीस व नगरपंचायतीचे दुर्लक्ष

शिर्डी/प्रतिनिधी - साईबाबा संस्थानला साईभक्तांच्या सेवेसाठी भव्य असे प्रसाद भोजनालय उभारले आहे. या रस्त्याला शिर्डी-निमगाव शिव रस्ता म्हणून ओळखले जाते. अनेक साईभक्त साईबाबांचा प्रसाद घेण्यासाठी पायी तर काहीजण चारचाकी वाहनातून याठिकाणी येत असतात. परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली अतिक्रमणे त्यातच तीनचाकी अॅपेरिक्षांचा झालेला सुळसुळाट यामुळे

या रस्त्यावर पायी चालणेदेखील धोक्याचे झाले आहे. वाहतूक शाखेचा दबदबा नसल्याने आणि शिर्डी अतिक्रमण विभागाचा वचक नसल्याने हे रस्ते अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहेत.वाहतूक शाखेचे पोलीस व कमी मनुष्यबळ असल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होते. भोजनालयाकडे जाणारा रस्ता हा अरुंद आहे. याच रस्त्यावर काहीजण रस्त्याच्या मध्यभागापर्यंत दुकाने थाटून बसतात. त्यातच

मोठ्या प्रमाणावर रुंद असलेला रस्ता या अतिक्रमनांमुळे रुंद होणार तरी कधी, हा सवाल उपस्थित होत आहे. या रस्त्यावर उभे राहणारे भिकारी शनिशिंगणापूरकडे जाणाऱ्या चारचाकी वाहने आणि त्यातील भक्तांना गराडा घालतात. हा रस्ताच सध्या विविध अतिक्रमणांसह बेकायदेशीर अवैध वाहतूक धंद्यात अडकला आहे. वाहतूक शाखेचे पो. नि. शहाजी नरसुडे यांनी या बाबतीत कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.