Breaking News

खेड, राशिन परिसरात महाराष्ट्र दिन उत्साहात

कर्जत तालुक्यातील खेड, राशिन परिसरात महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न झाला.प्राथमिक शाळा, विद्यालये, शासकीय कार्यालय आदी ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.


खेडच्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयात प्राचार्य चंद्रकांत मोरे यांचेहस्ते ध्वजारोहण झाले. प्राचार्य एन.बी. मुदनुर, चंद्रकांत चेडे, हासन सय्यद, माजी पंचायत समिती सदस्य आण्णासाहेब मोरे, मारुती सायकर, कुमार कापसे, काशीनाथ सोनवणे, रूपचंद गोळे, अमोल देमुंडे, आण्णासाहेब लोखंडे, विकास कुलकर्णी, यांचेसह सर्व शिक्षक-शिक्षकेतर उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. चंद्रकांत मोरे, कुमार कापसे, गोरक्ष भापकर यांची भाषणे झाली. मारुती सायकर यांनी आभार मानले. राशिनच्या ह.शु आडवाणी विद्यालयात प्राचार्य राजेंद्र नष्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याावेळी समाज विकास संस्थेचे अध्यक्ष अल्लाउद्दीन काझी, यशवंत देशमुख, प्रा. एस.डी. तोरकड, प्रा. मुस्ताक शेख, प्रा. विजय शेलार, प्रा. विठ्ठल काळे, प्रा. दिगांबर साळवे, प्रा.राहुल नायकोडे, प्रा.अकबर सय्यद , प्रा. अल्ताफ कडकाले, प्रा. दिपक बेल्हेकर आदी उपस्थित होते. प्रा. विठ्ठल काळे, प्रा. दिगांबर साळवे यांची भाषणे झाली. भांबोरा येथील श्री. सिद्धेश्‍वर विद्यालयात प्राचार्य मच्छिंद्र बेद्रे यांचेहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पर्यवेक्षक बाळासाहेब घोरपडे, सतीश पंडित, संजय तळेकर, गोविंद लोखंडे, उर्मिला शिर्के, सुवर्णा फुले, वैशाली अनारसे, उर्मिला पाटील, अनिल फराटे आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
थेरवडी जिल्हा परिषद शाळेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. सरपंच वसंत कांबळे यांनी ध्वजारोहण केले. ग्रामपंचायत सदस्य मोहन गोडसे, बाळासाहेब थोरात, पोलीस पाटील रामचंद्र कांबळे, मुख्याध्यापक अजिनाथ पठाडे, सुशील कांबळे, संतोष शिंदे, नंदा पवार, नफिसबानू शेख, मीरा खेडकर, सुरेखा शिंदे, नयना साळुंके, पल्लवी वाघ, सोपान थोरा, अंगद गोडसे, तुकाराम गोडसे, आप्पा कांबळे आदी उपस्थित होते.