Breaking News

रानडुकराच्या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी

बुलढाणा - विवाह सोहळयाकरीता निघालेल्या वधूकडील वर्‍हाडी मंडळींवर रानडुकराने हल्ला चढवीत तिघा जणांना जखमी केल्याची घटना मौजे मोरखेड गावात 30 एप्रिल रोजी घडली. मौजे मोरखेड येथील वधूकडील वर्‍हाडी मंडळी लग्न सोहळ्या करीता जामनेर तालुक्यातील खातगाव येथील वरमंडळी निघण्याच्या गडबडीत असताना नदीपात्रातील शेतशिवरातून सुसाट वेगाने आलेल्या रानडुक्कराने वर्‍हाडी मंडळीवर हल्ला चढविला. दरम्यान एकच गोंधळ उडाला. त्यावेळी क्रूझर गाडीत बसण्याच्या तयारीत असलेल्या राजेंद्र बबन जंगले वय 35 यांना या रानडुकराने शिंगाने धडक देत उचलून फेकले तसेच सौ.ममता रोकडे (वय 30) व संतोष सोनोने वय 36 यांच्यावर हल्ला करीत जबर धडक दिली यामध्ये राजेंद्र जंगले हे गंभीररित्या जखमी झाले. तर दोघे जण कि रकोळ जखमी झाले. यानंतर रानडुकर सुसाट वेगात पसार झाले. जखमींना पाहुणे मंडळींनी तात्काळ मलकापूर येथे उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मोताळा येथील वनविभाग अधिकाजयांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.