Breaking News

जि.प. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


जामखेड तालुक्यातील जवळा येथील जि.प. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कलाविष्कार-कलागुणांच्या या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन गावातील मान्यवरच्या यांच्या हस्ते करण्यात आले.
 
शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बालचमूंनी हिंदी, मराठी गाण्यांवर नृत्य सादर केले. अनमोल असे हे जीवन आनंदाने व उत्साहाने जगण्याचा तसेच शेतकर्‍यांच्या व्यथा आपल्या गाण्यातून मांडून समाजामध्ये मोलाचा संदेश लहानग्यांनी दिला. लोप पावत चाललेल्या लोकसंस्कृती व लोकगीतांकडे दृष्टिक्षेप टाकत अस्सल मराठमोळी गीतांचा कार्यक्रम यावेळी सादर झाला. भक्तिगीत, ओवी, वासुदेव गीत, गोंधळ, शेतकरी गीत, आदिवासी नृत्य, धनगरी गीत, कोळी गीत, गवळण, वाघ्या मुरुळी, जोगवा आदी गीतांनी परिसर रंगून गेला. विविधरंगी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी प्रेक्षक वर्गाची मने जिंकली. मराठी संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी यातून घालून दिला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विकास हजारे, बाळासाहेब रोडे यांचेसह आदी शिक्षकांनी  नियोजन केले. 

यासाठी मुख्या. मंगल रोडे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास जामखेड पं. स. सभापती सुभाष आव्हाड, जि.प. सदस्य सोमनाथ पचारणे, ज्योती क्रांतीचे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ हजारे, जवळा गावचे प्रदीप पाटील, सरंपच अनिल पवार, उपसरपंच गौतम कोल्हे, युवा नेते प्रशांत शिंदे , शरद हजारे, उमेश रोडे, काकासाहेब वाळूजंकर, हाळगाव शाळेचे केंद्रप्रमुख त्र्यंबके, शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष राम निकम, अहमदनगर शिक्षक बँकेचे संचालक सीमा क्षीरसागर सर्व शिक्षक, विद्यार्थी, यांचेसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.