Breaking News

अनधिकृत फ्लेक्स लावल्याप्रकरणी श्रीगोंद्यात गुन्हा दाखल


श्रीगोंदा : शहरातील साळवंनदेवी रोडला टिपू सुलतान चौक या नावाचा फ्लेक्स लावल्यामुळे शहरामध्ये काहीकाळ तणाव निर्माण झाला होता, परंतु पोलिसांनी तात्काळ त्याठिकाणी जाऊन हा फ्लेक्स काढून घेत सदर बोर्ड लावणार्‍या व्यक्तीस ताब्यात घेतल्याने तणाव निवळला. याबाबत माहिती अशी की शहरातील साळवनदेवी रस्त्यावर दि. 1 मे रोजी सायंकाळी 6 वाजणेच्या सुमारास या चौकात टिपू सुलतान चौक या नावाचा फ्लेक्स बोर्ड अनधिकृतरीत्या लावण्यात आला, 

या बोर्डवरून साळवनदेवी रोडवर काही लोक एकत्र आले होते. त्या बोर्डवरून तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे श्रीगोंदा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली असता, पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन हा फ्लेक्स काढला व हा बोर्ड लावणार्‍या अतिक गुलांमहुसेन कुरेशी रा. कुरेशी गल्ली, श्रीगोंदा यांना ताब्यात घेतल्यामुळे हा तणाव निवळला, या घटनेबाबत श्रीगोंदा नगरपरिषदेतील कर्मचा़र्‍यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अतिक कुरेशी याच्याविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृतरीत्या असा कापडी फ्लेक्स लावून शहराची मालमत्ता विद्रुप केल्याप्रकरणी महाराष्ट्र मालमत्ता विरुपन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.