Breaking News

डिकसळ येथील महाश्रमदानामध्ये विविध शहरांतील नागरिक सहभागी


कर्जत: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे पानी फाऊंडेशन आयोजित महाश्रमदानामध्ये पुणे, नगर, ठाणे, मुंबई अशा विविध शहरांतुन आलेल्या नागरिकांसह तालुक्यातील नागरिकांनी सहभागी होऊन श्रमदान केले.
 
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सर्व तालुक्यात महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये विविध शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी यांचेसह भारतीय जैन संघटना कर्जत तालुका, रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी तसेच स्त्री फौंडेशन अशा विविध संघटनांनी आपली उपस्थिती दर्शविली. कर्जत तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी टीमनेदेखिल श्रमदानात उत्सफुर्तपणे सहभागी होऊन लोकांचा उत्साह वाढविला. सामाजिक वनीकरण विभागाने श्रमदानात सहभागी होऊन उपस्थित नागरिकांकडून वृक्ष लागवडीची व संवर्धनाची शपथ घेतली.

कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे 1 मे रोजी 650-700 च्या जनसमुदायाने महाश्रमदानात भाग घेऊन 110 घन मीटरचे काम केले. या केलेल्या कामात एका पावसात 1 लाख 10 हजार लीटर पाणी साठवू शकेल एवढ़े काम झाले आहे. पावसाळ्याच्या 4 महिन्यांत साधारणतः 20 वेळा जरी पाऊस झाला तरी सुमारे 2 लाख 20 हजार लीटर पाणी साठा यामधून तयार होईल. म्हणजेच या श्रमदानातून 10 हजार लीटर क्षमतेचे सुमारे 220 टँकर पाणी जमिनीत मुरले जाणार आहे. एवढा पाणी साठा तयार केला फक्त 4 ते 4.30 तासात. हिच असते दोन हातांची ताकद व श्रमदानाची ताकद.या महाश्रमदान कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, एन.एस सिंगल, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष अभय बोरा, प्रकल्प संचालक आशिष बोरा, नितीन देशमुख, डॉ. राजेंद्र खेत्रे, अ‍ॅड. नवनाथ कदम, श्रीराम गायकवाड, दयानंद पाटील, घनश्याम नाळे, अ‍ॅड. नवनाथ फोंडे, अ‍ॅड. गोपाळ कापसे, अरविंद पाटील, सुभाष तनपुरे, मनोज निलंगे, स्त्री फाउंडेशनच्या मनीषा सोनमाळी, निर्मला खराडे, डॉ. कांचन खेत्रे, भूषण देसरडा, यश बोरा, अनिकेत खाटेर, विनोद बोरा, वरद म्हेत्रे, प्रवीण मुनोत, नूतन विद्यालयाचे प्राचार्य, स्टाफ व विद्यार्थी आदींसह डिकसळचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते. 

या महाश्रमदानासाठी पानी फाऊंङेशन टीमचे तालुका समन्वयक अमोल लाङगे, योगेश अभंग, बाळासाहेब बगाटे, अपेक्षा सूपेकर, जयदिप जगताप, मंगेश पिचङ, बाळासाहेब पाङे, बीजेएसचे समन्वयक शरद थोरात यांचेसह डिकसळचे सरपंच अ‍ॅड. महेंद्र शिंदे, तात्याराम वडवकर, लक्ष्मण लाढाने, पुष्पा लाढाने, मारुती पवार, मारुती थेटे, भाऊसाहेब थेटे, डॉ. मनोहर लाढाने, महादेव परहर, सतीश लाढाने, सचिन कालेकर, लालासाहेब पवार, ग्रामसेवक राजेंद्र कदम, तलाठी सुजाता गुंजवटे, उत्तम पवार व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.