‘मुळा’चे आवर्तन सुरूच ठेवा : घुले
उन्हाळी हंगामासाठी मुळा धरणातून दि. १ मेपासून आवर्तन सुरु आहे. मुळाच्या लाभक्षेत्रातील नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील सर्व बंधारे, पाझर तलाव भरेपर्यंत हे आवर्तन सुरूच ठेवण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी केली आहे.
ते म्हणाले, या आवर्तनामुळे परिसरातील विहिरीची पाण्याच्या पातळीत वाढ होऊन परिसरातील नागरिकांचा पिण्याचा प्रश्न सुटेल. या उन्हाळी हंगामासाठी सुटलेले आवर्तन उन्हाळा असल्याकारणाने अत्यंत महत्वाचे असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतक-यांच्या शेतीसाठी जलसिंचनाचा प्रश्न सुटेल.