नारायण राणेंच्या महत्वाकांक्षी हॉस्पिटलच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडला !
सिंधुदुर्गनगरी, दि. 11, मे - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कसाल - पडवे येथे उभारलेल्या लाईफ टाइम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे उद्घाटन येत्या 27 मे रोजी होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. स्वतः नारायण राणे यांनी स्वाभिमानच्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत हि माहिती दिली.
सिंधुदुर्गातील रुग्णांची आरोग्याची हेळसांड रोखण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कसाल पडवे येथे लाईफटाइम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारले आहे. 650 बेडचे हे हॉस्पिटल सुरु झाल्यानंतर येथील रुग्णांची फार मोठी गैरसोय टळणार असल्याने या हॉस्पिटलच्या शुभारंभाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा अमित शहा यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन करण्याची इच्छा नारायण राणेंनी व्यक्त केली होती. या दोघांचा वेळ मिळत नसल्याने उद्घाटनाचा मुहूर्त टळत होता. मात्र अखेर मोदी, शहांच्या गैरहजेरीतच हा उद्घाटन सोहळा आटोपण्याचा निर्णय राणेंनी घेतला आहे. त्यानुसार येत्या 27 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते राणेंच्या या महत्वाकांक्षी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. याबाबत राणेंनी अद्याप प्रसार माध्यमाना अधिकृत माहिती दिली नसली तरी जिल्हा कार्यकारणी बैठकीत पदाधिकार्यांना नियोजनाचे आदेश दिलें आहेत.