शेतकरी मार्गदर्शन बैठक उत्साहात
आश्वी : येथील पिंप्री-लौकी आजमपूर येथे शेतकरयांना खरीप हंगाम नियोजन आणि मार्गदर्शनासाठी आयोजित करण्यात आलेली बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. राष्ट्रीय कृषी विकास योजना व कृषी विकास योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यात आदर्श ग्रामीण अँग्रो प्रोड्युसर कंपनी आणि इंदोर येथील बायोसर्ट अँग्रो इंटरनेशनल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना गांडूळ खतनिर्मिती, स्लरी युनिट, कंपोस्ट खत निर्मीती, माती-पाणी परिक्षण, सेंद्रिय शेतमालाचे प्रमाणपत्र व सेद्रिंय शेतीबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विभागाचे वैभव कानवडे, सेंद्रिय शेती तज्ज्ञ बाळासाहेब खेमनर, प्रा. गंगाधर चिंधे, केशवराव फणसे, दिलीप लावरे, संजय लावरे, सुनिल गिते, अशोक दातीर, भास्कर दातीर, तुकाराम लावरे आदींसह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.