Breaking News

देशातील सुरक्षेच्या स्थितीत मोठी सुधारणा : राजनाथ सिंह

भोपाळ - देशाच्या सुरक्षाव्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. ही सरकारची मोठी कामगिरी आहे आणि यामुळेच गेल्या चार वर्षांत भारतात मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे. पंजाबमधील गुरुदासपूर आणि पठाणकोट येथे झालेला पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी हल्लादेखील आपल्या जवानांनी उधळून लावला होता. एवढेच नाही, तर दुसरीकडे देशाच्या विविध भागात माओवादीदेखील नियंत्रणात आले आहेत, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानदेखील उपस्थित होते. गेल्या चार वर्षांपूर्वी देशातील जवळपास 126 जिल्हे माओवादी हिंसाचाराच्या प्रभावाखाली होते. मात्र आता ती संख्या 90 वर आली आहे. यापैकी, माओवादी केवळ 10 ते 11 जिल्ह्यांतच सक्रीय आहेत.