वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे युद्धपातळीवर प्रयत्न
सातारा, दि. 30, मे - वादळी पावसामुळे फलटण तालुक्यात विस्कळीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने युद्धपातळीवर प्रयत्न करत सर्व कौशल्य पणाला लावले. आज मंगळवारी दुपारपर्यंत बहुतेक भागांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले. वादळात मोठमोठी झाडे पडल्यामुळे फलटण तालुक्यात महावितरणचे तीनशेह वीजखांब जमीनदोस्त झाले. ठिकठिकाणी तारा तुटल्या. वादळी पावसाने फलटण तालुक्यास झोडपून काढले. ठिकठिकाणी मोठेमोठे वृक्ष उन्मळून पडले, झाडांच्या फांद्या तुटल्या. याचा फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला आणि अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर लगेच महावितरणचे अभियंते, जनमित्र तसेच ठेकेदाराची 8 पथके वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामासाठी सर्व ठिकाणी एकाच वेळी रवाना झाली.
अनेक ठिकाणी पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. पावसामुळे अनेक ठिकाणी चिखल झाल्यामुळे दुरुस्तीच्या कामात अढथळा आला. वीजखांबांवर कोसळलेली झाडे व फांद्या कापून बाजूला काढणे, उभारणे आणि शेवटी तारा ओढणे अशा टप्प्यात ही कामे केली गेली. फलटण शहर तसेच तालुक्याच्या बहुतेक गावांत वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. ग्रामीण भागात कृ षिपंपांचा वीजपुरवठा खंडित असून, तोही पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महावितरणचे अभियंते, जनमित्र व ठेकेदाराचे कामगार अशा 250 जणांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम केले, असे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.