जामखेड / शहर प्रतिनिधी - जामखेड दुहेरी हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार उल्हास माने उर्फ टकलू तूपवाला अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्या हत्येचा कट रचलेल्या त्या तालमीचा मालक जामखेड दुहेरी हत्याकांड गुन्हा रजि.नं. 75/2018 क 302 भादवि इतर मधील आरोपी मुख्य सूत्रधार उल्हास माने यास पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार पो.काँ. अल्ताफ शेख, पो.काँ. बढे, पो.काँ. अमीन शेख, पो.काँ. साने आदींच्या टीमने कर्जत तालुका परिसरात दि. 5 मे रोजी सकाळी 9.45 वा. पोलिस मित्रांचे मदतीने ताब्यात घेतले आहे. जामखेड येथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. मूजावर यांच्यासमोर हजर केले असता, उल्हास माने व विजय सावंत यांना 10 मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.यावेळी न्यायालयाच्या आवारात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान दि. 4 मे रोजी मुख्य आरोपी गोविंद दत्ता गायकवाड यालाही कोर्टाने 10 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आत्तापर्यंत या हत्याकांड प्रकरणात 9 जणांना अटक केलेली आहे. रेकॉर्डनुसार आणखी एक आरोपी ताब्यात येणे बाकी असून पोलिस त्याचा कसून शोध घेत असल्याचे पोलिस उपाधिक्षक सुदर्शन मुंढे यांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले. जामखेड शहरातील विंचरणा नदीच्या पलिकडे जांबवाडी रोडवर शिवशंकर नावाची तालमी आहे, या तालमीत गुंड पोसले जात असून तेथील तथाकथित मल्ल दहशत माजविण्याचे काम करत आहेत. उल्हास माने अहमदनगर येथील सेक्स स्कँडल मधील टकलू तूपवाला म्हणून विख्यात आरोपी आहे.
जामखेड दुहेरी हत्याकांड अखेर मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात
Reviewed by Dainik Lokmanthan
on
07:31
Rating: 5