Breaking News

राज्यांत वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली शक्यता

नवी दिल्ली : येत्या 24 तासात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी वार्‍यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यातील इतर भागात हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान विदर्भाच्या पश्‍चिम भागामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे येत्या 24 तासात मराठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी वार्‍याहसह पाऊस पडणार असल्याचा वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारताला वादळी वार्‍याचा फटका बसला होता. त्यानंतर पश्‍चिम बंगाल, ओडिशा, बिहार आणि उत्तरप्रदेश या चार राज्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. उत्तर भारतात वादळाने मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. 24 तासात उत्तर भारतातील तीन राज्यात 104 जणांचा मृत्यू झाला होता. वादळाचा सर्वाधीक फटका उत्तरप्रदेशाला बसला आहे. या वादळाने उत्तर प्रदेशात 64, राजस्थान 34 आणि उत्तराखंडमध्ये 6 जणांचा या बळी घेतला आहे. 
विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात एक दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण या दरम्यान शेतकर्‍यांनी आपल्या पिकाची काळजी घ्या. या अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच आपल्या धान्यांना योग्य त्या ठिकाणी झाकून ठेवा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.