Breaking News

निलेश ठुबे याने जिद्दीने मिळवलं नेट परीक्षेत यश.


सुपा : पारनेर तालुक्यातील बाबुर्डी गावचे सुपूत्र निलेश हनुमंत ठुबे या विद्यार्थ्यांने नुकत्याच झालेल्या नेट परीक्षेत घवघवीतपणे यश संपादन केले आहे.निलेश ने नेट परीक्षेत देशात 52 वा क्रमांक मिळवुन आपल्या आईचे आणि बाबुर्डी गावासह तालुक्याचे नाव मोठ केलं आहे. निलेश ने आपलं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शिक्षण श्री रोकडेश्‍वर माध्यमिक विद्यालय बाबुर्डी येथे पुर्ण करून नंतर पुण्याच्या एसपी कॉलेजला पदवी संपादन केली.
 
लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलेल, घरची परिस्थिती अत्यंत हालाखिची मात्र माता ताराबाईने शेतात काबाडकष्ट करून निलेश आणि नितिन या दोन्ही मुलांचं शिक्षण पुर्ण केलं. लहानपणापासून अभ्यासाची आवड असणार्‍या निलेश ने आपल्या आईच स्वप्न साकार केले असून मराठी शाळेत शिक्षण घेऊन आपली स्वप्नं पूर्ण होतात हा आदर्शच निलेश ने दाखवून दिला आहे. या यशाबद्दल निलेशचे जिल्हा परिषद सदस्या राणी लंके, पंचायत समितीचे सभापती राहूल झावरे, उपसभापती दिपक पवार, बाबुर्डीच्या सरपंच आशा दिवटे, उपसरपंच गोरख दिवटे, भोयरे गांगर्डाचे सरपंच भाऊसाहेब भोगाडे, उपसरपंच दौलत गांगड, पत्रकार शरद रसाळ, बाबुर्डीतील ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले.