Breaking News

पत्रकारितेतील नैतिकता जपत उत्तुंग भरारी घ्या : डॉ. खेडलेकर


श्रीरामपूर : पत्रकारिता हे आव्हानात्मक क्षेत्र असून पत्रकारितेतील नैतिकता जपत उत्तुंग भरारी घेण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले. सावत्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत संगमनेर महाविद्यालयाच्या पदव्युत्तर वृत्तपत्र विद्या पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी प्रा. खेडलेकर बोलत होते. 


यावेळी वृत्तपत्र पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी प्रा. खेडलेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रत्येकामध्ये विशिष्ट गुणवैशिष्ट्ये आहेत. पत्रकारितेची मूल्ये जपत प्रामाणिकपणे या क्षेत्रात कार्य करा असे खेडलेकर म्हणाले. याप्रसंगी विदयार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकारितेतील बारकावे, शब्दांची पेरणी, नैतिक मूल्ये, दिग्गज लोकांचा सहवास आदी अनेक गोष्टी वर्षभर शिकायला मिळाल्याबद्दल विदयार्थ्यांनी ऋण व्यक्त केले. यावेळी आनंद गायकवाड, संतोष दिवे, सुनील दवंगे, संपत कोंडार, गणेश सांगळे, सोमनाथ वाजे, ज्ञानदेव बुळे, साईकिरण कडुस्कर, अमित भोसले, हेमंत पोटे, मच्छिंद्र यादव, मांजाबापू साळवे, स्वप्निल रणखांबे, शुभांगी लंके, सुचिता कुलकर्णी, कीर्ती विटेकर, मंगेश मेघे, दत्ता पगार, अमोल वाघमारे, भूपाल शेळके, राजेश बोरुडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक संतोष दिवे यांनी तर आभार अमित भोसले यांनी मानले.