Breaking News

राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीस महाबळेश्वर येथे प्रारंभ


सातारा : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या राज्यस्तरीय बैठकीला महाबळेश्वर येथील राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आज दि. १२ मे २०१८ रोजी समितीचे अध्यक्ष यदुनाथ जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सुरूवात झाली.

यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा संचालक शिवाजी मानकर, औरंगाबाद-लातूर विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ,सदस्य सर्वश्री रवींद्र बेडकीहाळ, प्रदीप मैत्र, संजय तिवारी, पूजा शहा, विनोद जगदाळे, लक्ष्मीदास इनामदार, योगेश त्रिवेदी, किरण नाईक, धनंजय जाधव, नंदकुमार सुतार, सुधीर महाजन, विलास मराठे, बालाजी सुर्यवंशी, अमरावती-नागपूर विभागाचे प्र.संचालक राधाकृष्ण मुळी, पुण्याचे उपसंचालक मोहन राठोड, उपसंचालक गोविंद अहंकारी, लातूरचे उपसंचालक यशवंत भंडारे, कोकण व‍िभागाचे प्र. उपसंचालक अनिरूद्ध अष्टपुत्रे, नाशिकचे प्र. उपसंचालक किरण मोघे, कोल्हापूर विभागाचे सहाय्यक संचालक सखाराम माने उपस्थित होते.