जवळे कडलग येथे गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे एका पन्नास वर्षीय शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवार दि. ८ रोजी सकाळी उघडकीस आली आहे.याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जवळे कडलग येथील वाळीबा नारायण साळुंके ( वय – ५० ) यांनी आपल्या राहत्या घरात कोणीही नसताना दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.मंगळवारी सकाळी वाळीबा साळुंके आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांना त्वरित घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली असून पुढील उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तपास तालुका पोलीस करत आहे. वाळीबा साळुंके यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणावरून केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र या आत्महत्येमुळे जवळे कडलग परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.