Breaking News

घरफोडीत ९० हजारांचा मुद्देमाल लंपास


संगमनेर शहरानजिकच्या राहणे मळा शिवारात अज्ञात चोरट्याने बंगला फोडून सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात  आला. 

राहणे मळ्यातील राजेंद्र म्हातारबा कांबळे यांच्या बंद असलेल्या बंगल्याचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून आत घरात प्रवेश केला. बंगल्यातील रोख ८० हजार रुपये रोख आणि १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला.