Breaking News

दरोड्याच्या तयारीतील दरोडेखोर जेरबंद


राहता तालुक्यातील निर्मळ पिंप्री शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या नाशिक येथील चौघांना लोणी पोलिसांनी जेरबंद केले. यातील एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. या चौघांकडे दरोड्याचे साहित्य आणि हत्यारे मिळून आली. 

सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. धिरज भवरसिंह चव्हान, विजय अर्जुन सोनावणे}, अमित हिरामण सोनावणे, आणि अक्षय बाळू महाले सर्व रा. नाशिक } अशी जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.