Breaking News

पानोडीत अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल


आश्वी : वार्ताहर - संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे झाडांच्या फांद्या तोडल्यावरून झालेल्या वादात एका महिलेला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी लता जीवन कदम या महिलेने आश्वी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंग आणि अँट्रॉसिटीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. 

याप्रकरणी देण्यात आलेल्या तक्रारीत लता कदम यांनी म्हटले आहे, रविवारी {दि. २९} सकाळी साडेदहाच्या सुमारास गट नं ६३ / २ मध्ये नांगरट करण्यासाठी ट्रँक्टर येणार होता. शेताच्या कडेला पडलेले व नांगरटीला अडथळा आणणाऱ्या लिबांच्या झाडाच्या फांद्या तोडत असतांना भाऊसाहेब तळेकर तेथे आला. त्याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीत कपडे फाडले गेले. शिवाजी तळेकर आणि तुकाराम तळेकर यांनी पतीसह मला ला मारहाण केली. दरम्यान, चंद्रकांत कदम आणि आनु कदम यांनी येऊन भांडण सोडवले. या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरिक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धनवडे हे करत आहेत.