Breaking News

संवादातूनच विद्यार्थी तणावमुक्त होतील : विखे समर कॅंपच्या पहिल्या बॅचचा समारोप


लोणी प्रतिनिधी - मैत्री, स्वावलंबन आणि संवाद साधण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास धनश्री विखे यांनी व्यक्त केला. लोणी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रवरा समर कॅंपच्या पहिल्या बॅचच्‍या समारोपप्रसंगी त्यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. पहिल्या बॅचमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेतील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना याप्रसंगी पारितोषिके देण्यात आली. 
याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या, ज्या गोष्टी सुट्टीत टिव्हीसमोर होवू शकल्या नसत्या त्या समर कॅम्पच्‍या माध्यमातून यशस्वी झाल्या. या कॅम्पमुळे एकमेकांना मित्र मिळाले. दहा दिवसांच्या सहवासात विद्यार्थ्‍यांमध्‍ये झालेल्या गप्पामुळे संवादाची प्रक्रिया सुरू झाली. विद्यार्थ्‍यांनी एकमेकांशी केलेले शेअरिंग उद्याच्या वाटचालीसाठी आनंददायी ठरेल. पालकांनी आपल्या पाल्‍यांशी संवाद वाढवला पाहिजे. धावपळीच्या वातावरणही पाल्यांना वेळ द्यावाच लागेल, असे सुचित करून विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा समर कॅम्पमधूच वैयक्तिक छंद आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

यावेळी ईश्वरी दिघे, दिव्या पाटील, विदीशा तुरकणे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या समरकॅम्पच्या समारोप कार्यक्रमास डॉ. अभिजीत मिरीकर, डॉ. सतिष तुरकणे, प्राचार्या लीलावती सरोदे, देवकर, वृषाली थोरात आदींसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.