भाजप- राष्ट्रवादीच्या खेळीत पटोलेंचा राजकीय बळी-प्रकाश आंबेडकर
नागपूर, दि. 12, मे - स्वतःची चामडी वाचवण्यासाठी पंतप्रधान व भाजपला खूष करण्याच्या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेसने भंडारा-गोंदिया मतदारसंघात कमजोर उमेदवार उतरवला आहे. या सर्व खेळात नाना पटोलेंचे राजकरण संपल्याचा गौप्यस्फोट भारीप बहूजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज, शुक्रवारी नागपुरात केला. यासंदर्भात बोलताना आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर इंडियामधील भ्रष्टाचा-यांच्या फाईल्स बाहेर काढताच राष्ट्रवादीच्या गोटात धडकी भरली. त्यातच नाना पटोले यांच्या राजीनाम्याने त्यांची मोदी विरोधी म्हणून देशभर प्रसिद्धी झाली आहे. त्यामुळे नाना पटोलेंना भंडारा-गोंदियाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारत कमजोर उमेदवार दिला. यामुळे मोदींना खूष करून स्वत:वरील चौकशी थांबविण्यासाठी राष्ट्रवादीने नाना पटोलेंचा राजकीय बळी घेतला आहे.
मोदींसारख्या अतिमहत्त्वाकांक्षी आणि द्वेषाचे राजकारण करणा-या व्यक्तिला सरळ आवाहन देण्याचे धाडस पहिल्यांना नाना पटोलेंनी केले. त्यामुळे पोट निवडणुकीच्या माध्यमातून ते ज्वाईंट किलर ठरले असते. सदस्यत्व सोडणा-यास उमेदवारी देण्यात येते. मात्र काँग्रेसने त्यांना उमेदवारी न देता राष्ट्रवादीसाठी जागा सोडली. राष्ट्रवादीकडूनही कमकु वत उमेदवार देवून भाजपचा पयार्याने पंतप्रधानांचा विजय होईल, असाच मार्ग तयार केला.
कमकुवत उमेदवार दिल्याचा खुलासा राष्ट्रवादीने करावा, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात राष्ट्रवादीच्या आशिर्वादानेच भाजपची सत्ता आली. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये साटलोट असल्याचे पुन्हा एकादा स्पष्ट झाले आहे. कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र, भारिप काँग्रेससोबत येत नसल्याचा आरोप वारंवार केल्या जातो. या निवडणुकीत त्यांच्या सोबत असतो. मात्र त्यांनी कोणतीही विचारणा न करता राष्ट्रवादीला तिकिट दिली. ही निवडणूक एकतर्फी होता कामा नये म्हणून भारिपने उमेदवार दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना झालेल्या विमान खरेदी व्यवहाराची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्याचे काय झाले, असा सवाल ही त्यांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची चौकशीची फाईल तयार आहे. या फाईलींच्या माध्यमातून भाजप द्वेशाचे राजकारण करीत असून राष्ट्रवादी काँग्रेस चौकशीतून स्वत:ला वाचविण्यासाठी इतरांचा बळी घेत असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.
‘इव्हीएम’ विरोधात जनता आंदोलन करेल:- भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी किती इव्हीएम आणण्यात आल्या, याचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा. या संदर्भातील एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल आले. निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. ईलेक्ट्रॉनिक मशीन मॅन्युप्युलेट करता येते. इंग्लड आणि रशीयातील दोन व्यक्ती सर्व डाटा घेवून बसले आहेत. त्यामुळे इव्हीएम विरोधात जून महिन्यात मोठे आंदोलन होणार असून सामाजिक संस्थांच्या नेतृत्वात लोक रस्त्यावर येणार असल्याचे त्यांनी अॅड. आंबेडकर यांनी सां गितले.