Breaking News

शिवनीत गोदामाला भीषण आग, गोदामातील लक्षावधीचे साहित्य खाक


अकोला, दि. 12, मे - शिवनी स्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगरातील मुक्ता पॅकेजींगच्या गोदामाला आज शुक्रवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत लक्षावधीचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रणात आणली. आग विजवण्यासाठी दहा ते बारा गाड्या लागल्या.

प्राप्त माहितीनुसार, शिवनी परिसरात राष्ट्रीय महामार्गाला लागूनच डॉ. नितीन मुळे यांचे मुक्ता पॅकेजींगचे गोदाम आहे. या गोदामात लाखो रुपये किंमतीचे फर्निचर बनविण्यासाठी आवश्यक लाकूड व इतर साहित्य, पेपर बॉक्स (कार्टून बॉक्स) डुप्लेक्स पेपर रोल मोठ्या प्रमाणात होते. गोदामाबाहेर ठेवलेल्या फर्निचरला आग लागली. ही आग विद्युत तारेपर्यंत पोहोचल्याने गोडाऊनच्या मिटरमध्ये शॉटसर्किट झाला आणि आग गोदामच्या आतमध्ये पोहोचली. त्यामुळे गोदामातील पेपर रोल आणि फर्निचर साहित्याने पेट घेतला. पाहता पाहता आगीने विक्राळ रूप धारण केले अन् काही वेळेतच गोदामातील साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले अन् आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. तासाभरात अग्निशमन विभागालच्या 10 गाड्या लागल्या.

अग्निशमन विभागाच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. वृत्त लिहिस्तोवर आग विझविण्याचे कार्यशेवटच्या टप्प्यात होते. अन् अग्निशमन विभागाचा कर्मचारी वाचला गोदामात अग्नि तांडव अन् जळणाचा धुर यामध्ये जीव धोक्यात टाकून आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे कर्मचारी संतोष हर्षेवाल गोदामात गेले होते. तेव्हड्यातच प रिसरातील एका युवकाच्या धक्क्याने गोदामाचे शेटर बंद अन् संतोष हर्षेवाल गोदामात अडकले. त्यामुळे एकच तारांबळ उडाली अन् त्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू झाले. अग्निशमन विभागाचे क र्मचारी, पोलीस व नागरिकांच्या मदतीने गोदामाचे शेटर तोडण्यात आले व संतोष हर्षेवाल यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. परिसरातील नागरिकांचा गोंधळ आग बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. गर्दीतील एका युवकाच्या चुकीमुळे अग्निशमन दलातील एका कर्मचार्‍याचा जीव धोक्यात गेला. परंतु, सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. या घटनेनंतर सिव्हिल लाईन पोलिस ठाण्याचे ठाणेदार अन्वर शेख यांनी नागरिकांना बाहेर काढले व परिस्थिती नियंत्रणात आणली.