Breaking News

मुख्यमंत्र्यांकडून मराठी शिकण्यास तयार : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांना प्रत्त्यूत्तर देतांना ठाकरे म्हणाले, ‘कूटनीती, साम-दाम-दंड-भेदचा अर्थ काय?, अर्थ समजण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडून मराठी शिकण्यास तयार आहोत’,मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी भाजपा कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपाकडून कारवाईची भाषा वापरण्यात आल्याने शिवसेनेने देखील आता अंगावर आल्याने भाजपाला शिंगावर घ्यायचे ठरवल्याचे दिसत आहे. ‘ऑडिओ क्लिप माझीच होती, पण त्यातील शेवटचे वाक्य त्यांनी सादर केले नाही. अन्यथा तोंडावर पडले असते,’ असे प्रत्युत्तर देणाऱया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे.