Breaking News

सीआरपीएफच्या वाहनाचा अपघातघठ 19 जवान जखमी

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील केंद्रीय राखीव सुरक्षा दल (सीआरपीएफ) च्या गाडीवर झालेल्या दगडफेकीमुळे गाडीचा अपघात झाला. या अपघातात गाडीतील 19 जवान जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आले असून यामध्ये काहींना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, सीआरपीएफच्या अधिकाऱयांनी दगडफेक करणाऱया अज्ञात फुटीरवाद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सकाळी सीआरपीएफचे जवान एका टेम्पोतून श्रीनगरहून दुसऱया शहरात जात असताना ही घटना घडली आहे. शाम लाल पेट्रोल पंपाजवळ जवानांची गाडी येताच काही फुटीरवाद्यांनी तुफान दगडफेक केली. यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी उलटली. या अपघातामुळे गाडीतील 19 जवान जखमी झाले.