Breaking News

भाजप-शिवसेना वाद विकोपाला कथित ऑडिओ क्लीपमध्ये आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईला तयार : मुख्यमंत्री


मुंबई : पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सध्या सुरू असलेले वाद दिवसेंदिवस तीव्र होत असून, दोन्ही पक्ष एकमेकांना आव्हान देतांना दिसून येत आहे. कथित ऑडियो क्लिपमध्ये आक्षेपार्ह काही आढळल्यास कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी के ले. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे यांनी देखील आपल्या ठाकरे शैलीत समाचार घेत, ‘कूटनीती, साम-दाम-दंड-भेदचा अर्थ काय?, अर्थ समजण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडून मराठी शिकण्यास तयार आहोत’ असे आव्हान दिले. त्यामुळे भाजप शिवसेनेतील वाद पेटण्याचे चिन्हे दिसून येत आहे. 
मुख्यमंत्री म्हणाले शिवसेने अर्धवट आणि एडिटेड क्लिप पसरवली आहे. मी 14 मिनिटांची पूर्ण क्लिप निवडणूक आयोगाला दिली आहे. त्यामध्ये काहीही आक्षेपार्ह असले तर आयोगाने माझ्यावर कारवाई करावी. पण शिवसेनेने जे केले त्यावरही कारवाई करण्याची विनंती आम्ही आयोगाला केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मोदी सरकारची 4 वर्षेपूर्तीनिमित्त पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मोदी सरकारच्या 4 वर्षाच्या काळात केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक निधी मिळाला आहे. सौभाग्य योजना, प्रधानमंत्री ग्राम रस्ते विकास योजना, तसेच 3 कोटी 98 लाख घरांत गॅस जोडणी, जीवनज्योती विमा योजनेचा 5 कोटी 35 लाख नागरिकांना लाभ, याचबरोबर 15 हजार ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मोदी सरकारची 4 वर्षेपूर्तीनिमित्त पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, शेतकरी अडचणीत आल्यावर केंद्र सरकारने वेळोवेळी मदत केली आहे. हे सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे आहे. प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभ सर्वात जास्त महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मिळाला आहे. गेल्या 10 वर्षात आघाडी सरकारने जेवढी तुरीची खरेदी केली, त्यापेक्षा जास्त खरेदी गेल्या दोन वर्षात आम्ही के ल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.